प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चार वर्षांत प्रथमच 10 तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस बरसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात  भूजलस्थिती खालावलेली नाही. तरी देखील या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. कारण या तालुक्यातील भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात 1.20 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे.

  • भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजारात १.२० मीटरने वाढ

अमरावती (Amaravati).  चार वर्षांत प्रथमच 10 तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस बरसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात  भूजलस्थिती खालावलेली नाही. तरी देखील या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. कारण या तालुक्यातील भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात 1.20 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. हे तीन तालुके वगळता 11 तालुक्यांमध्ये मात्र भूर्गभातील पाण्याची पातळी 0.50 मीटरचे आतच आहे.

अमरावती जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत 931.0 मिमीच्या तुलनेत 878.7 मिमी पाऊस झालेला आहे. ही 94.3 टक्केवारी आहे. यात सर्वाधिक 884.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 132.6 मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात 752.2 मिमी (67.5 टक्के)व चिखलदरा तालुक्यात 843.2 मिमी (56.9 टक्के) पाऊस झाला.

गतवर्षी 12 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे 17 दिवस राहिले व सरासरीच्या 131 टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात 23 दिवस पाऊस पडला. सरासरीच्या 98 टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात 18 दिवस पावसाचे राहिले व सरासरी 77 टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात 16 दिवस पाऊस पडला व सरासरीच्या 93.10 टक्के पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात
सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या 90.2 टक्के पाऊस पडला. गतवर्षी पावसाळा पश्चात मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. यापूर्वी सलग चार वर्षे भूजलात कमी आल्यामुळे सध्या तीन तालुक्यांत 1.20 मीटरपर्यंत वाढ व 11 तालुक्यात 0.50 मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.