केसाळ अळीचे पिकांवर आक्रमण; पीक वाढीपूर्वीच नष्ट होण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत

जिल्ह्यातील मेळघाट भागात (in Melghat area) शेतकरी (Farmer) पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे केसाळ अळीचे. पिकांवर (crops) पडलेल्या 'केसाळ अळी'चे (hairy larvae) या अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांची पाने ही अळी कुडतळत आहे.

    अमरावती (Amravati).  जिल्ह्यातील मेळघाट भागात (in Melghat area) शेतकरी (Farmer) पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे केसाळ अळीचे. पिकांवर (crops) पडलेल्या ‘केसाळ अळी’चे (hairy larvae) या अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांची पाने ही अळी कुडतळत आहे. दरम्यान या अळीचा सर्वाधिक प्रभाव हा चिखलदरा तालुक्यातील (Chikhaldara taluka) जंगल परिसरातील गावांमध्ये दिसून आला.

    दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून शेतात बियाण्याची पेरणी केली त्या शेतात मात्र या अळीचा प्रादुर्भाव नसल्याचा जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले.

    काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात पेरणी केली मेळघाटामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मका पिकाची लागवड करतात सध्या मक्याचे पीक हे वर आले आहे. परंतु अशातच चिखलदारा तालुक्‍यातील जंगल भागातील जवळपास अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या केसाळ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याने पिके धोक्यात आली आहे.

    त्यामुळे पुन्हा एकदा येथील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सुद्धा मुबलक पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.