राजापेठ पोलिस यंत्रणेची धडधड वाढली; सागरची पोलिस ठाण्यातच आत्महत्या; कोणावर होणार कारवाई ?

राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीला एकमेव लोखंडी दार आहे. ते सुमारे १० ते १२ फुट उंचीचे असावे. दाराच्या अगदी वरच्या भागाला आरोपीने shirt  बांधला. त्या शर्टची बाहीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारीच उघड केली होती. त्यावेळी हवालातीत अन्य एक आरोपी होता, तो निद्राधीन होता. तसा जबाब त्याने दिला आहे.

    अमरावती (Amravati) : राजापेठ पोलिस ठाण्यात (Rajapeth police station) घडलेल्या सागर ठाकरे आत्महत्या प्रकरणाने (The Sagar Thackeray suicide case) पोलिसांची झोप उडविली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (The state criminal investigation department) या घटनेचा तपास करणार आहे. सोबतच स्थानिक सहाय्यक पोलिस आयुक्तांनी देखील प्रकरणाचा कठोर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. राजापेठ पोलिस ठाण्यात शनिवारीही दररोजप्रमाणे पोलिस यंत्रणेचे काम सुरू होते; मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वरिष्ठांच्या कारवाईची चिंता झळकत होती. आरोपीच्या आत्महत्या प्रकरणामुळे आणखी कोणाची नोकरीवर लटकती तलवार पडणार, याची कुजबूज चालू होती.

    अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक केली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते.

    हवालातीच्या दाराच्या आर्कला बांधले शर्ट
    पोलीस सूत्रानुसार, राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीला एकमेव लोखंडी दार आहे. ते सुमारे १० ते १२ फुट उंचीचे असावे. दाराच्या अगदी वरच्या भागाला आरोपीने shirt  बांधला. त्या शर्टची बाहीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारीच उघड केली होती. त्यावेळी हवालातीत अन्य एक आरोपी होता, तो निद्राधीन होता. तसा जबाब त्याने दिला आहे.

    ‘ते’ Police चौकशीच्या फेऱ्यात (They in the round of interrogation)
    घटनेवेळी ड्युटी ऑफीसर (Duty Officer Of Rajapeth Police Station) म्हणून पीएसआय, दोन रायटर, तपास मदतगार, संगणकावर व स्टेशन डायरीवर दोन महिला पोलीस कर्तव्यावर होत्या. हवालातसमोर चार अधिक एक गार्ड अशी ड्युटी होती. असे असताना सागरने सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याने हाकेच्या अंतरावर असलेली ही सारी मंडळी नेमकी काय करीत होती, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे तेदेखील कारवाईच्या कक्षेत येण्यार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालातीच्या भिंतीला लागूनच पोलीस कर्मचारी हजर असतात.

    ठाणेदारांच्या कक्षात ‘सीसीटीव्ही स्क्रिन’ (CCTV screen in Thanedars room)
    राजापेठ पोलीस ठाण्यात एकूण १६ सिसीटिव्ही कॅमेरा आहेत. ते ठाणेदारांच्या कक्षातील स्क्रिनला जोडण्यात आले. पैकी १४ कॅमेरे सुरू आहेत. हवालातमध्ये असलेल्या एका सिसिटिव्हीचा देखील त्यात समावेश आहे. पोलीस ठाणे, हवालातीपासून ठाण्यात कोणते वाहन, कोणता इसम प्रवेशला, हे ठाणेदार आपल्या कक्षातील स्क्रिनवर पाहू शकतात.