अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेमाची विनवणी केली; आरोपीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

महिला व मुलींची छेड (Incidents of molestation) काढण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. असंच कृत्य करणं अमरावतीतील एका सराईत आरोपीला चांगलंच महागात पडलं आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला (an accused) न्यायालयाने .......

    अमरावती (Amravati). महिला व मुलींची छेड (Incidents of molestation) काढण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. असंच कृत्य करणं अमरावतीतील एका सराईत आरोपीला चांगलंच महागात पडलं आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला (an accused) न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (The district and sessions judge) यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला आहे.

    विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ऊर्फ सोनू गणेश उदासी (३८, रा. मोर्शी) असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना २५ ऑक्टोंबर २०१७ ला मोर्शी शहरात घडली होती. पीडित १४ वर्षीय मुलगी ही दोन लहान भावांसाठी चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. दुकानाजवळ उभा असलेला प्रशांत उदासीने पीडितेकडे पाहून शिटी वाजविली. त्यानंतर अश्लील इशारा केला; परंतु मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मुलगी घरी जायला निघाली. त्याचवेळी प्रशांतने मुलीचा दुचाकीने पाठलाग करून काही अंतरावर तिचा हात पकडून प्रेमाची विनवणी केली.