होळीला चपलांचे हार घालून पेटविण्यात आल्याचा आरोप; राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसह हिंदू धर्माचा पवित्र सण समजल्या जाणाऱ्या होळीला चप्पल व बुटाचा हार घालून तसेच चपला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप शिवसेनेच्या दर्यापूर कार्यकर्त्यांनी केला आहे.

    दर्यापूर (Daryapur).  खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसह हिंदू धर्माचा पवित्र सण समजल्या जाणाऱ्या होळीला चप्पल व बुटाचा हार घालून तसेच चपला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप शिवसेनेच्या दर्यापूर कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे हिंदु धर्माच्या भावना दुखावल्याने राणा दा

    म्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दर्यापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदारांना निवेदनातून केली आहे.

    हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी डीएफओ यांचा शिवसेनेने निषेधही नोंदविला आहे. त्याच बरोबर शिवकुमारवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. परंतु खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसह होलिकेऐवजी होळीलाच चपलांचा हार घालून हिंदू व आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्याचे सेनेचे म्हणणे आहे.

    राणा दांम्पत्याने प्रसिद्धीसाठी होळीला फुलांचा हार घालण्याऐवजी चपलांचा हार घातला व व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. होळी सणाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून समाजातील नकारात्मक शक्ती, वाईट विचार, वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी व सकारात्मक उर्जा मिळण्यासाठी होळीचे दहन करण्यात येते; परंतु होळीला चपलांचे हार घालून पेटविण्यात आल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचे सेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे राणा दांम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी दर्यापूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.