हिंगणघाटमध्ये वस्तरा मारून युवकास जखमी केले

हिंगणघाट (Hinganghat). वर्धा जिल्ह्यातील स्थानिक नन्हाशाह वार्ड येथील येथील रहिवासी दिपक मदनकर या वीस वर्षीय युवकास लोटन चौक दर्गाहजवळ वस्तरा मारून गंभीर जखमी करण्यात आले.

सदर घटना आज दुपारी एक वाजताचे दरम्यान घडली असून आरोपी अनिकेत कांबळे रा.लोटन चौक यास अटक करण्यात आली.
आरोपीवर भादंवी ३२४,५०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.