chain snatching

अमरावती. शहरात पुन्हा चेन स्नॅचर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे( Increase in chain snatching in Amravati). मागील एक महिन्यापासून सुरू असलेले दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून त्यात आता महिलांचे दागिने हिसकाविण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गाडगेबाबा समाधी मंदिराजवळ पहाटे फिरायला आलेल्या ७० वर्षीय महिलेची ४ तोळ्याची चेन हिसकाविली. २ लाख रुपये किंमतीची चेन चोरण्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

गाडगेनगरमधील पलाशनगर लाईनमधील रहिवासी ७० वर्षीय रजनी कविटकर मंगळवारी पहाटे ६ वाजता समाधी मंदिराजवळ डॉ. दिवाण गल्लीमध्ये फिरत होत्या. त्यावेळी मागून एक दुचाकीस्वार आला. थोडे समोर जाऊन त्याने दुचाकी पलटवली. महिलेजवळ येताच त्याने सोन्याची चेन हिसकावून घेत पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. परिसरात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील पाहिले जात आहे.