शेवटी लॉकडाऊन झालेच… कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी घ्यावा लागला लॉकडाऊनचा निर्णय

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. . कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे.

    अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. . कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे.

    अमरावती जिल्ह्यात  दिवसाला कोरोना रुग्णांची वाढत आहे. अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात १२ कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत.  या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

    मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी कॅटेन्मेंट झोन असलेल्या श्रीकृष्ण पेठ येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या १२ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. अमरावती मनपा हद्दीत सध्या २७८३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली

    अमरावती जिल्ह्यातील अचलपुर परतवाडा सर्वात मोठा हाॅट स्पाॅट ठरला आहे. येथे ३५९ रुग्ण घेत आहेत उपचार उपवीभागीय अधीकार्‍यांचि माहिती, अचलपुर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ, आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असुन खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.