अमरावती, अचलपूर शहरात लॉकडाऊन; जिल्ह्यात मात्र लाॅकडाऊन नाहीच

अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री 8 वाजेपासून पुढील सात दिवस संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री Adv. यशोमती ठाकुर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन तास झालेल्या बैठकीनंतर रविवारी (21 फेब्रुवारी) पालकमंत्र्यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

  • सोमवारपासून सात दिवस राहणार कर्फ्यू
  • पालकमंत्री Adv. यशोमती ठाकूर यांची घोषणा

अमरावती (Amravati). अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री 8 वाजेपासून पुढील सात दिवस संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री Adv. यशोमती ठाकुर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन तास झालेल्या बैठकीनंतर रविवारी (21 फेब्रुवारी) पालकमंत्र्यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सोमवार 22 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपासून पुढील सात दिवसांकरिता लॉकडाऊन राहणार आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक बाबी सोडून सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद राहणार आहे. पुन्हा आज तब्बल 709 रुग्ण आढळून आले आहे. त्याचप्रमाणे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणसाठी विभागीय आयुक्त डॉक्टर पियुष सिंह यांनी स्वतंत्र अधिसूचना घोषित केली आहे. अन्य ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहे.