अमरावतीत झालं लॉकडाऊन; महाराष्ट्रातील १५ शहरांत कधीही लागू शकतं लॉकडाऊन

अमरावतीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून आठवडाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी होणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची विक्री आणि बाजार बंद असणार आहेत. या काळात इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत.

    अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच राज्यात १५ शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    अमरावतीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून आठवडाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी होणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची विक्री आणि बाजार बंद असणार आहेत. या काळात इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. तर उद्योग सुरू राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव वाढत असून स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्ह्यात बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.