चंद्रकांत पाटलांना महाविकास आघाडीवर बोलण्याचा अधिकार नाही; यशोमती ठाकूर यांची टीका

    अमरावती : परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्याचं राजकारण तापत आहे. सिबीआयने तपास हाती घेतल्यामुळे अनिल देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. याचं पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

    मागच्या सरकारने मंत्र्यांना दिलेल्या क्लीन चिट वरून भाजपची संस्कृती कळते. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटलां महाविकास आघाडी बद्दल बोलण्याचा काहीचं अधिकार नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

    “मंत्र्यांनी काही केलं नाही असं खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकलं की राजीनामा घेत आहात, एक नाही आता दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. काल एकाने चांगली कमेंट केली की ३६ बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचं काय. उरलेल्यांची रांगच लागणार आहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात. पण सर्वसामान्यांचं नुकसान करु नका,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.