Bachchu Kadu

बच्चू कडू आणि इतर शेतकरी मध्यप्रदेशमधील बैतुलमध्ये दाखल झाल्यावर राज्यातील भाजप सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी व्यवस्था केलेल्या मंगल कार्यालयात राहायाला मध्यप्रदेश पोलिसांनी नकार दिला.

अमरावती : पंजाब हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमवेर गेल्या अकरा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन ( farmers agitation ) करत आहेत. याच शेतकऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्यासोबत दुचाकीने मध्यप्रदेशात दाखल झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांचे हे आंदोलन मध्यप्रदेश सरकार (Madhya Pradesh govt ) दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मध्यप्रदेश सरकारला सांगूनही त्यांनी शेतकऱ्यांची आणि आपली राहण्याची सोय केली नसल्याने संपूर्ण रात्र वेअर हाउसमध्ये राहावं लागले आहे. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू आणि इतर शेतकरी मध्यप्रदेशमधील बैतुलमध्ये दाखल झाल्यावर राज्यातील भाजप सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी व्यवस्था केलेल्या मंगल कार्यालयात राहायाला मध्यप्रदेश पोलिसांनी नकार दिला. त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांना वेअर हाऊसमद्ये राहावे लागले आहे. भाजप सरकारने अशा प्रकारे आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास कृषी मंत्र्यांच्या घराला घेराव घालू असा इशाराच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

बच्चू कडू हे शेतकऱ्यांसोबत दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकमधून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत. शुक्रवारी ते मध्यप्रदेशात पोहचले. पोहोचण्यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या राहण्यासाठी मंगल कार्यालय बुक करुन ठेवले होते. परंतु पोलिसांनी तिथे राहू न दिल्याने त्यांना संपूर्ण रात्र वेअरहाऊसमध्ये काढावी लागली आहे. त्यामुळे त्यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. सकाळ होताच ते पुन्हा पुढच्या प्रवासाला दिल्लीकडे रवाना झाले आहेत.