अमरावतीत MIDC मध्ये पेस्टिसाइड कंपनीला भीषण आग; परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरूच

आगीमुळे कंपनीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे मध्यरात्रीपासूनच प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे 50 ते 55 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    अमरावती (Amravati) :  अमरावतीमध्ये भीषण आग लागल्याची (A huge fire
    in Amravati) घटना घडली आहे. अमरावतीच्या बडनेरा रोडवर (Badnera Road in Amravati) असलेल्या औद्योगिक वसाहत (an industrial estate) मधील नॅशनल केमिकल पेस्टिसाइड कंपनीला (the National Chemical Pesticide Company) ही आग लागली आहे. जवळपास मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिची आहे.

    या घटनेमुळे परिसरात आगीचे लोट वाढलेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे कंपनीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे मध्यरात्रीपासूनच प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे 50 ते 55 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाभरातील अग्निशमन यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान घटनास्थळी आगीचे प्रचंड लोळ पसरले असून पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. सध्या अग्निशामक दलाच्या वतीने आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.