खदान तलावाचे पाणी पशूपक्ष्यांसाठी राखीव; पशूपालकांच्या तक्रारीची अखेर दखल

येथील खदान तलावातील पाण्याचे मागील दोन वर्षापासून बांधकामासाठी उपसा होत आहे. परंतु हे पाणी पाळीव पशु तथा वन्य पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी पशुपालकांनी प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे अखेर मागणीची दखल घेत खदान तलावातून पाण्याच्या उपसा करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे.

    रिद्धपूर (Ridhpur).  येथील खदान तलावातील पाण्याचे मागील दोन वर्षापासून बांधकामासाठी उपसा होत आहे. परंतु हे पाणी पाळीव पशु तथा वन्य पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी पशुपालकांनी प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे अखेर मागणीची दखल घेत खदान तलावातून पाण्याच्या उपसा करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे.

    रिध्दपूर येथील खदान तलावाचे पाणी कंत्राटदार मागील दोन वर्षापासून बांधकामासाठी वापरत आहे. त्यामुळे तलावाचे तळ दिसायला लागल्याने पशूपालकांची चिंता वाढली होती. त्यामुळे सदर तलावाचे पाणी हे पाळीव पशू तथा वन्य जीवांना पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. अशी मागणी समाज कल्याण सभापती तात्यासाहेब मेश्राम यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी तात्यासाहेब मेश्राम यांनी पशुपालकांना निवेदन तयार करून संबधित प्रशासनाला या संदर्भातील जाणीव करून देण्याचे सुचवले. या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सिंचन उपविभाग अचलपूर यांनी दखल घेत कार्यवाहीला सुरवात केली आहे. श्रीराम गौरक्षण ट्रस्ट तथा 54 पशूपालकांनी तहसीलदार मोर्शी, जि प सिंचन उपविभाग अचलपूर, वरूड, ग्रामपंचायत रिध्दपूर यांना निवेदन दिले होते. मात्र ग्रामपंचायतने याबाबत कोणतीही दखल घेत नसल्याने वरिष्ठांना निवेदन देण्यात आले होते.

    उन्हाळ्यात पशुपक्षांसाठी पाणी आवश्यक उन्हाळा सुरू झाल्याने पशुपक्ष्यांसाठी पाणी साठवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीला पशूपालकांनी निवेदन दिल्यावरही काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पशूपालकांच्या विषयाने अत्यंत उदासीन आहेत ही बाब निषेधार्ह आहे. — सुभाष वानखडे, सामाजिक कार्यकर्ता

    लवकरच कायदेशीर कार्यवाही जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदारदाराला कायदेशीर नोटीस देऊन बांधकामासाठी व अन्य वापराला प्रतिबंध घालण्यात येणार आहे. कंत्राटदाराने सदरील पाणी विना परवानगी वापरले आहे. -- गोळे, उपअभियंता जिप सिंचन उपविभाग