आमदार रवी राणांची अखेर सुटका
आमदार रवी राणांची अखेर सुटका

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आंदोलन केल्यामुळे पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आलेले बडनेराचे आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राणा यांच्यासह काही शेतकऱ्यांनाही पोलिसांनी तुरुंगात डांबल्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले होेते; मात्र राणा यांनी तुरुंगातून सुटताच पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर विखारी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान त्यांनी सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’पुढे आंदोलन करण्याची इशाराही ठाकरे सरकारला दिला आहे. 

अमरावती (Amaravati). जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आंदोलन केल्यामुळे पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आलेले बडनेराचे आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राणा यांच्यासह काही शेतकऱ्यांनाही पोलिसांनी तुरुंगात डांबल्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले होेते; मात्र राणा यांनी तुरुंगातून सुटताच पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर विखारी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान त्यांनी सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’पुढे आंदोलन करण्याची इशाराही ठाकरे सरकारला दिला आहे.

आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत. आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचां आरोप केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा रविवारी शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या (सोमवारी) मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या.

अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

आमदार रवी राणा यांच्या अटकेवरून राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.’शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’ असं फडणवीस म्हणाले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केलं होतं. आमदार राणा आणि शेतकरी यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला होता. अखेर आंदोलनाला हिंसक वळण लागले होेते.