प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चिखलदरा तालुक्यातील जलसंकट दूर करण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी मोथा गावाला भेट देऊन तेथे नवीन विहिरी तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसेच ये-जा करणाऱ्या रस्त्यावरील तुटलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.

  चिखलदरा (Chikhaldara).   तालुक्यातील जलसंकट दूर करण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी मोथा गावाला भेट देऊन तेथे नवीन विहिरी तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसेच ये-जा करणाऱ्या रस्त्यावरील तुटलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.

  समस्या नेहमीसाठी सोडविणार
  दरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होते. टँकरच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु पाणीसमस्या नेहमीसाठी सोडविण्याचे प्रयत्न आमदार पटेल यांनी सुरू केले आहे. मोथा गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नवीन विहिरी आणि तलाव निर्मित केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची पातळी कमी होणार नाही, नागरिकांना चांगली सुविधा होईल, असे आमदार पटेल यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी मोथा ग्रामपंचायतच्या सरपंच विमल धांडे, उपसरपंच निखाडे, सदस्य आशा दहिकर, गजानन शनवारे, विनोद लांजेवार, राजेश सेमलकर, कमलेश राठौड, संदीप अलोकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

  तलावाजवळ बनवा विहिरी
  मोथा गावात शासनाची वॉटर कप योजना अग्रस्थानी आहे. गेल्या पाच वर्षात पाणी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलावाजवळ विहिरी तयार केल्यास गावातील पाणी समस्या दूर होईल. या कार्यासाठी आमदारांचे आभार मानू.
  — जगत शनवारे, माजी उपसरपंच, मोथा