श्रीनिवास रेड्डीच्या बचावासाठी निवेदन घेऊन आलेल्या महिला निवेदनकर्त्यांची खासदार नवनीत राणांनी केली कान उघडणी

खासदार नवनीत राणा यांनी या महिला निवेदनकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसंच निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

    अमरावती:डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात खासदार नवनीत राणा काल चांगल्याच भडकल्याच पाहायला मिळालं.

    झालं असं की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या श्रीनिवासा रेड्डी यांची कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना खासदार नवनीत राणा यांच्याकडे आपल्या घेऊन पाठविले.

    मात्र खासदार नवनीत राणा यांनी या महिला निवेदनाकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसंच निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. याआधी कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांनी नवनीत राणा यांची आज सकाळी भेट घेऊन रेड्डीना आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आणि रेड्डी सारख्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली.

    दीपाली चव्हाण यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी रेड्डीला कडक शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केले.