Navneet Rana and Ravi Rana finally charged; The bullet ride fell heavily

शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रम निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्याचे पती आमदार रवी राणा हे दोघेही बुलेटने शिवजयंतीच्या कार्यक्रमसाठी गेले होते. त्यांना ही बुलेट राईड भारी पडली आहे. कोरोनाचे नियम मोडल्या प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    अमरावती : शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रम निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्याचे पती आमदार रवी राणा हे दोघेही बुलेटने शिवजयंतीच्या कार्यक्रमसाठी गेले होते. त्यांना ही बुलेट राईड भारी पडली आहे. कोरोनाचे नियम मोडल्या प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    अमरावती शहरात शिवजयंती कार्यक्रमात नवनीत राणा आणि रवी राणा सहभागी झाले. यावेळी ते बाईकवरुन ते कार्यक्रम स्थळी हजर झाले. मात्र, दोघांनीही मास्क लावला नव्हता. यामुळे पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.

    विनामास्क उपस्थित राहणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्या प्रकरणी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या सह पंधरा कार्यकर्त्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, विदर्भात कोरोनाचा कहर वाढला आहे. अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.