सुपर स्पेशालिटीतच आता ऑक्सीजनची टाकी ; तब्बल २० हजार लीटरची क्षमता

कोरोना महामारीत काही दिवसांपूर्वी ऑक्सीजनची मोठी कमतरता झाली होती. ऑक्सीजन सिलिंडरची होणारी टंचाई लक्षात घेता सुपर स्पेशालिटी रुग्णालयातच आता ऑक्सीजनची टाकी बसविण्यात आली आहे. या ऑक्सीजन टाकीची क्षमता तब्बल 20 हजार लीटरची असल्याची माहिती आहे. ऑक्सीजन टाकी बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

अमरावती. कोरोना महामारीत काही दिवसांपूर्वी ऑक्सीजनची मोठी कमतरता झाली होती. ऑक्सीजन सिलिंडरची होणारी टंचाई लक्षात घेता सुपर स्पेशालिटी रुग्णालयातच आता ऑक्सीजनची टाकी बसविण्यात आली आहे. या ऑक्सीजन टाकीची क्षमता तब्बल 20 हजार लीटरची असल्याची माहिती आहे. ऑक्सीजन टाकी बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

याच आठवड्यात कार्यान्वयन

ऑक्सीजन टाकी सोमवारी रात्री अमरावतीत पोहोचली. सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये टाकी बसविण्याचे काम केल्या जात आहे. याच आठवड्यात ऑक्सीजन टाकीचे इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांचे म्हणणे आहे. इन्स्टालेशन झाल्यानंतर रुग्णांना ऑक्सीजन सेवेचा लाभ मिळणार आहे.

शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढली होती. त्यामुळे शहरातील सरकारी तसेच खासगी हॉस्पीटल देखील हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे ऑक्सीजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. संक्रमण वाढत असताना रुग्णांना देखील बेड मिळत नव्हती. ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने काही रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर ऑक्सीजन टाकी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोंबर महिन्यात कोरोनाची गती थोडी मंदावली आहे. मात्र, हिवाळा सुरू होत असून दुसरा टप्पा सुरू होण्याचे संकेत आहे. त्यामुळे टाकीच्या माध्यमातून ऑक्सीजन सेवा मिळणे गरजेचे आहे.