पिस्तुल शुटर राहुल उगलेची राष्ट्रीय स्पर्धेत निवड; हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील खेळाडूचे यश

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील पिस्तुल शुटर राहुल उगले यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 8 व्या वेस्ट झोन पिस्तुल 10 मिटरच्या शुटींग चॅम्पीयनशिप 2021 मध्ये 8 वी रॅन्क मिळवून यश संपादन केले आहे.

    अमरावती (Amravati).  श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील पिस्तुल शुटर राहुल उगले यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 8 व्या वेस्ट झोन पिस्तुल 10 मिटरच्या शुटींग चॅम्पीयनशिप 2021 मध्ये 8 वी रॅन्क मिळवून यश संपादन केले आहे.

    राहुल उगले हा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित रायफल शुटिंग क्लबचे प्रशिक्षक व डीग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील एमए योगा या कोर्सचा विद्यार्थी आहे. त्याची दिल्लीत होणार्या राष्ट्रीय एअर पिस्तुल 10 मीटर शुटींग चॅम्पीयनशिपकरिता निवड झाली आहे. संस्थेचे प्रधान सचीव प्रभाकरराव वैद्य, कोषाध्यक्ष डॉ. सुरेशराव देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, प्रा. डॉ. माधुरी चेंडके, आनंद महाजन, ललीत शर्मा, धर्मेंद्र दवे यांनी राहुल उगलेचे अभिनंदन केले.