कत्तलीसाठी नेत असलेल्या ४० जनावरांना पोलिसांमुळे जीवनदान; कंटेनरमध्ये दाटीवाटीने भरलेल्या गोवंशाची सुटका

कत्तलीसाठी नेण्यात येणारी चाळीस गोवंश जनावरांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. यांची किंमत तीन लाख वीस हजार रुपये इतकी आहे. या संबंधाने नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक २६५/२०२१ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ........

    अमरावती (Amravati) : औरंगाबाद- नागपूर हायवेवर गोवंशाची अवैध वाहतूक (the illegal transport of cattle) होत असल्याबाबत नांदगांव खंडेश्वर पोलिसांनी पोलिसांची नुकतीच दमदार कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर (The Nandgaon Khandeshwar police) येथील पोलिसांनी नाकाबंदी लावली. या दरम्यान पोलिसांनी १० चाकी कंटेनर (10 wheeler container) थांबवून मोठा सापळा उघड केला आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

    कत्तलीसाठी नेण्यात येणारी चाळीस गोवंश जनावरांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. यांची किंमत तीन लाख वीस हजार रुपये इतकी आहे. या संबंधाने नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक २६५/२०२१ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५, ५अ, ५ब, ११, प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम ११ घ, ड तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा नोंद
    करण्यात आला आहे.

    सदर कंटेनर जप्त करून चालक हकीम घासी खान, वय ३५ वर्ष, यास अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर हरी बालाजी एन., मा. अपर पोलीस अधीक्षक, श्याम घुगे व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पूनम पाटील यांचे मार्गदर्शनात नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, हेमंत ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हवालदार भगत, पो.ना. रंगारी, पो.ना. सरकटे, पो.शि. बंडू खडसे, चालक सहा. पो.उप नि. डवले यांनी केली आहे.