पोलिसांनी तपासणीसाठी दोन तरुणांना अडविलं; ‘चेकिंग’ दरम्यान गांजाची मोठी खेप जप्त

मादक पदार्थांची चोरटी आयात (the smuggling of narcotics) थांबविण्यासाठी (to stop up) राज्य पोलिस विभागाने (The state police department) कंबर कसली आहे. दरम्यान धारणी पोलिस चमूंच्या सतर्कतेमुळे (the vigilance of the police team) गांजाची (cannabis) मोठी खेप पकडण्यात यश आले आहे.

    अमरावती (Amravati) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या (Maharashtra and Madhya Pradesh) सीमा भागातून (the border areas) मादक पदार्थांची चोरटी आयात (the smuggling of narcotics) थांबविण्यासाठी (to stop up) राज्य पोलिस विभागाने (The state police department) कंबर कसली आहे. दरम्यान धारणी पोलिस चमूंच्या सतर्कतेमुळे (the vigilance of the police team) गांजाची (cannabis) मोठी खेप पकडण्यात यश आले आहे.

    दोन तरुण एका दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्यांना तपासणीसाठी अडविले. गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये 42 किलो गांजा लवपून ठेवल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. यामुळे पोलिसही चक्रावून गेले. (Large quantity of cannabis seized from Dharani police, two arrested)

    अर्पित संजय मालवीय ( २५ ) रा. कवडाझिरी, सय्यद अली सय्यद हासम ( ३० ) रा. दुबई मोहल्ला धारणी अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण हे अमली व मादक पदार्थांच्या तस्करीत असून त्यांच्या अटकेनंतर गांजा व्यवसायातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    डिबी स्कॉड प्रमुख पीएसआय मंगेश भोयर, अमलदार चंद्रशेखर पाठक, आशिष मीटनकर, जगन तेलगोटे, राहुल रेवस्कर, वंदना तायडे यांच्यासह चालक संजय मिश्रा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

    दरम्यान, धारणी पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलीस दप्तरी कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते हे करत आहेत.