amravati university

ऑनलाईन परीक्षा घेण्यास असमर्थ ठरल्याने प्रोमार्क कंपनीळा ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून ही कारवाई करण्यात आली.

अमरावती. ऑनलाईन परीक्षा घेण्यास असमर्थ ठरल्याने प्रोमार्क कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे (Promark company blacklisted for failing to appear for Amravati University exams). संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून ही कारवाई करण्यात आली. परीक्षा स्थगित करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांना कोणताच त्रास होऊ देणार नसल्याचे कुलगुरू डॉ. चांदेकर यांचे  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे उन्हाळी- २०२० परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे काम नागपूर येथील प्रोमार्क कंपनीला दिले होते.

या संदर्भात २० ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षा सुरू झाली. परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचे लॉगिन होत नव्हते, या ह तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कंपनीची असमर्थता लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी कंपनीच्या संचालकांना खडसावले आणि गठीत तांत्रिक समितीने कंपनीला दिलेला ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले.