घरकुल योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील निधी त्वरित उपलब्ध करून द्या; आपचा आंदोलनाचा इशारा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्यातील निधीसाठी लाभार्थ्यांना नगर परीषद चक्रा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मागणीनूसार तिसऱ्या टप्यातील निधी लाभार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावा.

    चांदूर रेल्वे (Chandur Railway).  प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्यातील निधीसाठी लाभार्थ्यांना नगर परीषदकडे चक्रा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्यातील निधी त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना करण्यात आली आहे. अन्यथा १५ मे नंतर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

    पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळावा याकरीता आम आदमी पार्टीने नगर परिषदेवर “ताला ठोको” आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर काही दिवसांतच लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळाला होता. परंतु आता पुन्हा एकदा तिसऱ्या टप्यातील निधीसाठी लाभार्थ्यांना नगर परिषदेच्या चक्रा मारण्याची वेळ आली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू असलेले बांधकाम हे निधी अभावी ठप्प पडले आहे. दोन महिन्यापासून मुंबई येथे तिसऱ्या टप्प्याचा निधी जमा झाला असून, राज्यात 302 कोटी 50 लाख रुपये निधी जमा झाल्याचे आपचे म्हणने आहे.

    दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्यातील लाभ अजून पर्यंत का मिळालेला नाही असा प्रश्ना आप ने उपस्थित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्यातील निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आप नेते नितीन गवळी व मेहमुद हुसेन यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी आपचे कार्यकर्ते चरण कोल्हे, पंकज गुुडधेही उपस्थित होते.

    नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना पहिला टप्पा द्या
    चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 405 लाभार्थ्यांना नव्याने घरकुल योजना मंजुर झाली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांनाही पहिला टप्यातील निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याचीही मागणी आम आदमी पार्टीने निवेदनातूनन केली आहे.