
रिध्दपूर येथून आष्टोली प्रमुख मार्गावरील खार्या नाल्यावरील पुलाचे लोकार्पण तथा रस्त्याचे भुमीपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले.
रिध्दपूर (Riddhpur). रिध्दपूर येथून आष्टोली प्रमुख मार्गावरील खार्या नाल्यावरील पुलाचे लोकार्पण तथा रस्त्याचे भुमीपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याला आष्ट्रोलीचे सरपंच कोरे, पंकज हरणे, रघूभाऊ अढाऊ, सदाशिव वानखडे, विपुल हिवसे, नकुल अढाऊ, मोहित अढाऊ, सचिन डवके, मोहसीन खान, कैसर खान, विठोबा ठाकरे, नितीन वानखडे, अरविंद शिंगाडे, दिनेश भेले, चरपे तथा उपविभागीय अभियंता सोळंके, शाखा अभियंता दळवी उपस्थित होते.
यापुर्वीचा पुल पुर्णतः खचला होता त्यामुळे येथून ये-जा करण्यासाठी वाहनधारक तथा शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी बराच त्रास होत होता. रिध्दपूर आष्ट्रोली रस्त्याची त्रैवार्षिक दुरुस्ती करणे याकरीता 1 कोटी 96 लाख रुपये रुपये तर पुलाच्या निर्मितीसाठी 25 लाख रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. सदरील रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे. अनेक ठिकाणी गड्डे पडलेले असून अनेक ठिकाणचे डामरीकरण पावसाने उखडून गेले आहे.
आष्ट्रोली येथील नागरिकांना अमरावती, मोर्शी, चांदूर बाजार तथा अन्य कोणत्याही शहरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा यास्तव कार्यकर्त्यांनी याचे दुरुस्ती साठी आग्रह धरला होता. या रस्त्याचे नुतनीकरण होत असल्याने आष्ट्रोली वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.