राणा दांपत्य स्थानबद्ध, मुंबईला जाण्यास मनाई

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गुरुकुंज मोझरी या ठिकाणी रास्तारोको केल्याप्रकऱणी शुक्रवारी आमदार राणा यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणी जामीन घ्यायला राणा यांनी नकार दिला होता. मात्र रविवारी त्यांनी जामीन घेण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी काही शेतकऱ्यांना घेऊन राणा दांपत्य मुंबईला रवाना होण्याची तयारी करत होतं.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राणा दांपत्याला स्थानबद्ध करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठीसाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईला जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गुरुकुंज मोझरी या ठिकाणी रास्तारोको केल्याप्रकऱणी शुक्रवारी आमदार राणा यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणी जामीन घ्यायला राणा यांनी नकार दिला होता. मात्र रविवारी त्यांनी जामीन घेण्याचा निर्णय घेतला.

संध्याकाळी काही शेतकऱ्यांना घेऊन राणा दांपत्य मुंबईला रवाना होण्याची तयारी करत होतं. मुंबई पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशानुसार राणा दांपत्याला मुंबईला न जाण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र हा सल्ला धुडकावून लावत राणा दांपत्याने मुंबईला जाण्याची आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या कलम १४९ नुसार दोघांनाही त्यांच्याच घरी स्थानबद्ध करण्यात आले. विदर्भ एक्सप्रेस रवाना होईपर्यंत त्या दोघांना पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र आम्ही पोलीस आयुक्तालयात थांबू, अशी भूमिका दोघांनी रात्री सव्वा नऊ वाजता घेतली. तर त्याचवेळी बडनेरा एक्सप्रेसमध्ये चढू पाहणाऱ्या काही आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.