प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

खर्रा थुंकायला गेला असता वाहनातून तोल जात चालक रस्त्यावर पडला. अशातच त्याच्या डोक्याला गंभीर इजा होत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास शिवारातील जिनिंग नजिकच्या मोवाड मार्गावर घडली.

    जलाखेडा (Jalakheda) : खर्रा थुंकायला गेला असता वाहनातून तोल जात चालक रस्त्यावर पडला. अशातच त्याच्या डोक्याला गंभीर इजा होत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास शिवारातील जिनिंग नजिकच्या मोवाड मार्गावर घडली. प्रफुल्ल बंडू बागडे (27) रा.पुसला, (जि.अमरावती) असे मृतकाचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार मृतक प्रफुल्ल हा आपल्या बोलेरो पिकअप वाहनाने पुसला गावाकडे जात होता. दरम्यान जिनिंग परिसरात तो वाहनातून खर्रा थुंकायला गेला असता तोल जात चालक रस्त्यावर पडला. या दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. जखमी अवस्थेत प्रफुल्लला जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्यास घोषित केले. मृत प्रफुल्लचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथेच ठेवण्यात आला. माहिती जलालखेडा पोलिसांनी मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करुन घटनेची नोंद केली. पुढील तपास सुरु आहे.