पोलिस गार्डवर निलंबनाची कारवाई, गुन्हे अन्वेषण विभाग करणार चौकशी

दुपारी १२ च्या सुमारास सागराची बहीण, जावई व भाऊ राजापेठ ठाण्यात पोहोचले. बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संबंधित पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.

  अमरावती (Amravati) : राजापेठ पोलीस ठाण्यातील (Rajapeth police station) अतिसुरक्षित लॉकअपमध्ये झालेल्या सागर ठाकरे (२४) (Sagar Thackeray) या आरोपीच्या पहाटेच्या आत्महत्येवर (Sucide) त्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून, संबंधितांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी राजापेठ ठाण्यातील (Rajapeth police station) पोलीस गार्ड (police guard) प्रश्नांत इंगोले (Prashant Ingole) यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी चालविली आहे. घटनेनंतर लगेचच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी क्राईम) (the State Criminal Investigation Department) (CID)ने मोर्चा सांभाळून स्थानिक पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे.

  गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघड झाल्यानंतर दुपारी ४.३० पर्यंत राजापेठ ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास सागरचा मृतदेह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

  अतिसुरक्षित पोलीस कोठडीत आरोपीने गळफास कसा घेतला, यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. सागर ठाकरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याला फ्रेजरपुरा ठाण्यातील उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस लॉकअपमध्ये सीसीटीव्हीसह पोलीस गार्ड तैनात असताना घडलेल्या आत्महत्येने पोलीस ठाण्यातील “निग्लेजंसी ऑफ वर्क’ चव्हाट्यावर आले आहे.

  मृतदेह हलवू देणार नाही; बहिणीचा आक्रोश
  दुपारी १२ च्या सुमारास सागराची बहीण, जावई व भाऊ राजापेठ ठाण्यात पोहोचले. बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संबंधित पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  जावयाने नोंदविली तक्रार
  सागर ठाकरे आत्महत्याप्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा. सागरच्या कुटुंबातील एकाला पोलीस सेवेत घ्यावे. शवविच्छेदन “इन कॅमेरा” व्हावे. जे पोलीस अधिकारी दोषी असतील, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी तक्रार सागर ठाकरेचे जावई मनोज निकाळजे (रा. नागपूर) यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

  त्याने मृतदेहासोबत काढले आठ तास
  राजापेठच्या लॉकअपमध्ये सागर ठाकरे याच्याव्यतिरिक्त बडनेरा पोलीस ठाण्यातील एक आरोपी होता. तो दुसरा आरोपी दुपारी ३ पर्यंत त्याच लॉकअपमध्ये सागरच्या मृतदेहाजवळ होता. डीसीपींच्या आदेशानुसार, दुपारी काही काळासाठी त्याला लॉकअपबाहेर काढण्यात आले तेव्हा तो भयभीत झाला होता. बडनेरानजीक वडगाव जिरे येथील रहिवासी असलेल्या त्या आरोपीला एका आरोपाखाली बडनेरा पोलिसांनी अटक केली होती. सागर ठाकरेची आत्महत्या झाली त्यावेळी आपण निद्राधीन होतो, असे बयान त्याने न्यायाधीश, सीआयडी व उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिले.