‘पीसीआर’च्या आरोपीची कोठडीत आत्महत्या; पोलिस वर्तुळात खळबळ

फ्रेजरपुरा पोलीसांनी बुधवारी आरोपी सागरला राजापेठ ठाण्यातील पोलिस कोठडीत ठेवले होते. परंतु त्यानंतर सागरने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या शर्टाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

    अमरावती (Amravati) : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexual abuse of a minor girl) केल्या प्रकरणातील एका आरोपीने राजापेठ ठाण्यातील (Rajapeth police station) पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सागर श्रीपत ठाकरे (Sagar Shripat Thackeray) (वय 24, रा. खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा ) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे अमरावती शहर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Accused suicide by hanging himself in a police cell at Rajapeth police station)

    पोलिस सुत्रानुसार, एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा फ्रेजरपुरा पोलीसांनी सागर ठाकरे विरुध्द नोंदविला आहे. पोलिसांनी तपास करून पिडित मुलीला परत आणले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून सागरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सागरला अमरावतीमध्ये बोलवून अटक केली. फ्रेजरपुरा पोलीसांनी बुधवारी आरोपी सागरला राजापेठ ठाण्यातील पोलिस कोठडीत ठेवले होते. परंतु त्यानंतर सागरने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या शर्टाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

    ‘सीआयडी’ची चमू पोहोचली पोलीस ठाण्यात (CID team reaches police station)
    गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर राजापेठ पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, शशिकांत सातव, एसीपी, सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक पोहोचले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर आणि सीआईडीचे अधीक्षक अमोल गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली होती.