अल्पवयीन गर्भवती तरुणीची आत्महत्या; बळजबरीतून राहिली ७ महिन्यांची गर्भवती

एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याने १७ वर्षीय तरुणी गर्भवती राहिली. बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतला.

    अमरावती, ७ महिन्यांची गर्भवती असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने (minor pregnant) आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यामध्ये समोर आली आहे.

    अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे.  एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याने १७ वर्षीय तरुणी गर्भवती राहिली. बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतला.  येवदा पोलिसांनी या नराधमास  ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोस्को म्हणजेच बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.