प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चिखलदरा तालुत्यातील (Chikhaldara district) आदिवासींवर अंधश्रद्धा (Superstitions) भारी होत चालली आहे. काही दिवसांआधी असाच एक संतापजनक प्रकार घडला होता. ताप आल्यानंतर पोटफुगीवर उपचार म्हणून तीन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते.

    अमरावती (Amravati). चिखलदरा तालुत्यातील (Chikhaldara district) आदिवासींवर अंधश्रद्धा (Superstitions) भारी होत चालली आहे. काही दिवसांआधी असाच एक संतापजनक प्रकार घडला होता. ताप आल्यानंतर पोटफुगीवर उपचार म्हणून तीन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या चिमुकल्यास अमरावतीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली.

    चिखलदरा तालुक्यातील आरोग्य केंद्र टेंब्रूसोंडाअंतर्गत येत असलेल्या खटकाली गावातील राजरत्न जामूनकर या चिमुकल्याला काही दिवसांपूर्वी ताप आला. त्यानंतर त्याला धामणगावगडी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, ताप कमी न होता त्याचे पोट फुगले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पोटावर चटके (डंबा) देण्यात आले. यामध्ये त्या बालकाची प्रकृती अधिकच खालावली.

    या घटनेची माहिती मिळताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बालकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी अमरावती येथे रेफर केले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तत्काळ सदर बालकाला वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले.