दहावी-बारावीच्या शाळा बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला आदेश

पून्हा कोरोनाचा धोका वाढतोय. सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोनाच वाधता उद्रेक पाहता वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

    अमरावती : पून्हा कोरोनाचा धोका वाढतोय. सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोनाच वाधता उद्रेक पाहता वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

    मुंबई वगळता राज्यात अनेक ठिकाणी शाळा जानेवारी पासून सुरु झाल्या आहेत. मात्र, आता या शाळा पून्हा बंद होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

    अमरावती शहरात देखील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दुपटीने वाढला आहे. यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याच्या अनुषंगाने पावले उपलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता १० वी व १२ वीच्या शाळांचा निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर घेण्याची मोकळीक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.