The boat capsized in the Wardha River; Jalasamadhi to 11 members of the same family who came for Dashakriya ritual

हे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे.

    अमरावती : वरुड तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव अलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    मंगळवारी सकाळी ही घडना घडली. हे सर्व जण दशक्रिया विधीसाठी आलेले होते. दरम्यान सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज मंगळवारी फिरायला गेले होते यावेळी ही घटना घडली. नाव उलटून पाच जणांना जलसमाधी मिळाली, तर सहा जणांचा शोध सुरू होता.

    हे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे.

    बोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शोधकार्य सुरू असून वृत्त लिहीपर्यंत 5 जणांचे मृतदेह हाती लागले होते. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. पोलिस व बचाव पथकाच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना