प्रेमी जोडप्याचे टोकाचे पाऊल; जंगलात पळून जात केली आत्महत्या, गावात खळबळ, दिवसांपासून होते बेपत्ता

मध्य प्रदेशातील सांगली या गावात 18 जूनपासून एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी फरार झाल्याची घटना घडली होती. ज्यात मुलीच्या कुटूंबियांनी तीन-चार दिवस शोध घेतल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसात तिच्या हरवल्याचा रिपोर्ट दाखल केला होता.

    अमरावती (Amravati).  मध्य प्रदेशातील सांगली या गावात एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी 18 जूनपासून फरार झाल्याची घटना घडली होती. ज्यात मुलीच्या कुटूंबियांनी तीन-चार दिवस शोध घेतल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसात तिच्या हरवल्याचा रिपोर्ट दाखल केला होता. पण गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दोघांचाही शोधन लागत नव्हता. अखेर आज या दोघांचा मृतदेह महाराष्ट्रच्या राजपूरच्या जंगलात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अरुण समाधान गोमतेरी, 26 वर्षे आणि करीना राजू कासदेकर, वय 16 वर्षे अशा दोघांचा संशयस्पद अवस्थेत महाराष्ट्रातील धारणी जवळच्या जंगलात मृतदेह सापडला. जंगलातील काही लाकूड तोडणाऱ्यांनी मृतदेह पाहिले आणि त्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. धारणी पोलीस ठाण्यात संपूर्ण माहिती दिल्यानंतर तरुण आणि मृत मुलीचे मृतदेह विच्छेदनासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

    हा तरुण आणि मुलगी 18 जूनपासून घरातून बेपत्ता होते आणि घरातील लोक त्यांचा सतत शोध घेत होते. मेळघाटचे आमदार राजकुमार यांना घटनेची माहिती मिळताच राजकुमार पटेल यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन दोन्ही कुटुंबातील लोकांशी चर्चा केली. तरूण आणि युवतीच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तर पुढील तपास धारणी पोलीस करत असल्याची माहिती आहे.