शेतकऱ्याने वांग्यांचा एकही तोडा न करता एकरभर पिकावरून ट्रॅक्टर फिरवला

कोरोना रुग्णांची (corona patients) वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. बंद असलेली बाजारपेठ (Closed markets), विस्कळीत वाहतूक व्यवस्था (disrupted transport systems) व अस्मानी संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.

    अमरावती (Amravati). कोरोना रुग्णांची (corona patients) वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. बंद असलेली बाजारपेठ (Closed markets), विस्कळीत वाहतूक व्यवस्था (disrupted transport systems) व अस्मानी संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. तूर, सोयाबीन, कपाशी व संत्राचे पिक (After losing the cotton, soybean, cotton and orange crops) हातातून गेल्यानंतर मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी उधार उसणवारी करून शेतात वांग्याची लागवड केली. मात्र टाळेबंदीनं घोटाळा केला. त्यामुळं निराश झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क एकही तोडा न करता एकरभर वांग्यांच्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला. (Corona Lockdown Badly Hit Farmers in Amravati)

    खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतले. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती, त्यांनी भाजीपाला लावला. त्यापैकीच शिरखेड येथील शेतकरी अशोक देशमुख यांनी एक एकर शेतात वांगी लावली होती. त्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. अशातच करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ३१ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. या टाळेबंदीचा फटका देशमुख यांना बसला. वांग्याला भाव मिळाला नाही. वांगी शेतातच सडण्याची वेळ आली. वांगी तोडणीचा खर्चही निघणार नव्हता. त्यामुळं एकही तोडा न करता त्यांनी चक्क एकरभर शेतावर ट्रॅक्टर फिरवला.

    शिरखेड येथील आणखी एक शेतकरी बिपीन देशमुख या शेतकऱ्याने शेतात भेंडी, चवळी लावली होती. आता भेंडी, चवळी बाजारात विकण्यासाठी घेवून जायचे तर लॉकडाऊन होते. त्यामुळे या शेतकऱ्याने अक्षरशः त्यामध्ये चरण्यासाठी गुरे सोडली. कारण भेंडी, चवळी तोडून विकायला घेवून जायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावर उत्तर म्हणून त्यांनी आपल्या शेतात गुरे सोडण्याचा निर्णय घेतला.