राणा दाम्पत्य मेळघाटमध्ये साजरी करणार होळी; होलिकोत्सवासह रंगपंचमीचा आनंद घेणार

अमरावतीच्या विद्यमान खासदार दरवर्षी होळी, रंगपंचमी मेळघाटातील आदिवासी बांधवासोबत साजरी करत असतात. यंदाही 28 मार्च रोजी राणा दाम्पत्य आपली होळी साजरी करणार आहेत.  बडनेऱ्याचे आ. रवी राणा व खासदार नवनीत राणा मेळघाटातील आदिवासी बांधवांना भेटून समस्या जाणून घेत होलिकोत्सवासह रंगपंचमीचा आनंद घेतील.

    चुरणी (Churani).  अमरावतीच्या विद्यमान खासदार दरवर्षी होळी, रंगपंचमी मेळघाटातील आदिवासी बांधवासोबत साजरी करत असतात. यंदाही 28 मार्च रोजी राणा दाम्पत्य आपली होळी साजरी करणार आहेत.  बडनेऱ्याचे आ. रवी राणा व खासदार नवनीत राणा मेळघाटातील आदिवासी बांधवांना भेटून समस्या जाणून घेत होलिकोत्सवासह रंगपंचमीचा आनंद घेतील. आदिवासींनी मागितलेल्या फगव्यात विकासकामे देत कोरकू नृत्यात सहभागी होतील.

    सलग 3 दिवस मुक्कामी राहत ते बोड गावात होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होतील. दिदमदा, बेरदा, भुलोरी, हतिदा, झापल, जुटपाणी, लाकटू, राणा पिसा, भोबई धाना, राजपुरा, ढोमना धाना, भवर, रेहट, शिवझिरी, राणीगाव, धुळघाट, जामपाणी, बिरोटी, खिडकी, कलमखार, नागझिरा, धारणी तालुक्यातील गावांना भेटी देतील.

    माखला, खडिमल, चुनखडी, नवलगाव, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, कामिदा, बारुगव्हान, बिबा, राहू, खारी, हिरदा, बोरध्दा, एकताई, सलिता, सुमिता, भाडुंम, खुटिदा, हतरू असा 3 दिवसांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. यानंतर चिखलदरा तालुक्यातही भेट देणार आहेत. याकरिता युवा स्वाभिमानचे शिलेदारही तयारीला लागले असल्याचे चित्र दिसून येते. विद्यमान खासदार आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक कोरकू नृत्यावर ठेका धरत ठुमकेही लगावतात.

    जे स्थानिक जनप्रतिनिधींला साधता आले नाही ते या जोडगोळीने नेमके हेरल्याने आदिवासी बांधवांना “जांगडी” स्थानिक बोलीभाषेत ‘अपना आदमी’ असा भाव उत्पन्न होतो. एकंदरीत खासदार व आमदार सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळवून ठेवत असल्याने लोकप्रिय आहेत. तर विरोधक नाटकबाजी म्हणून हेटाळणी करीत आहेत.