भरदिवसा १९.५० लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न; डोळ्यात तिखट फेकून चाकूही मारला

तिखट डोळ्यात फेकल्यानंतर चाकूने मारून एका तरुणाजवळील 19 लाख 50 हजाराची रोख ()Attempt to loot Rs 19 lakh cash लुटून नेण्याचा प्रयत्न (to rob a young man) झाला. या लुटमारीला विरोध केल्याने (Opposing the looting,) आरोपींनी झटापट करून पळ काढला. मनोज प्रताप चौधरी (35 रा. मराठाविहार, गोपालनगर) (Manoj Pratap Chaudhary, 35, Maratha Vihar, Gopalnagar)) असे जखमीचे नाव आहे.

    अमरावती (Amravati).  तिखट डोळ्यात फेकल्यानंतर चाकूने मारून एका तरुणाजवळील 19 लाख 50 हजाराची रोख ()Attempt to loot Rs 19 lakh cash लुटून नेण्याचा प्रयत्न (to rob a young man) झाला. या लुटमारीला विरोध केल्याने (Opposing the looting,) आरोपींनी झटापट करून पळ काढला. मनोज प्रताप चौधरी (35 रा. मराठाविहार, गोपालनगर) (Manoj Pratap Chaudhary, 35, Maratha Vihar, Gopalnagar)) असे जखमीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी भर दिवसात कोतवाली हद्दीतील सहकार भवनासमोरील खादीम शोरूमसमोर घडली.

    लुटारुशी झटापट केल्याने पैसे बचावले (Fighting the robbers saved money)
    मनोज चौधरी हे रेडीयंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. ली. या कंपनीत कार्यरत असून, विविध बॅकेंतील रोख रक्कम घेऊन ती स्टेट बॅकेत भरण्याचे काम करतात. गुरुवारी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास मनोज यांनी मालवीय चौकाजवळील गुलशन मार्केट स्थित यस बॅकेतून 19 लाख 50 हजारांची रक्कम घेऊन ती बॅगेत भरली. त्यानंतर बॅक पाठीवर घेऊन ते दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बॅकेकडे निघाले होते. परंतु दरम्यान खादीम शोरूमसमोर दोन तरुणांनी अचानक मनोजला थांबविण्याचा प्रयत्न केला.


    एका लुटारुने मनोजच्या डोळ्यात मिरची पुड फेकली आणि दुसऱ्याने धक्का देऊन त्यांना दुचाकीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. लुटारु बॅग हिसकाविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे पाहून मनोज यांनी दोन्ही लुटारुना विरोध केला. त्यावेळी लुटारुंपैकी एकाने मनोजच्या पाठीवर चाकूने वार केला. यावेळी झटापट झाल्यानंतर लुटारुंनी तेथून पळ काढला. या घटनेची तक्रार करण्यासाठी मनोज चौधरी कोतवाली ठाण्यात पोहोचले होते. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.