महिलेचा पारा चढला, तहसिलदाराला भर कार्यालयातच चोपून काढले, पहा व्हिडिओ

नायब तहसीलदारांना (Deputy Tehsildar) एका महिलेने त्यांच्या कार्यालयातच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेशन कार्ड (the ration card) लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरुन ही मारहाण (the beating) झाल्याचा आरोप केला जात आहे.

    अमरावती (Amravati). नायब तहसीलदारांना (Deputy Tehsildar) एका महिलेने त्यांच्या कार्यालयातच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेशन कार्ड (the ration card) लवकर तयार करून दिले नसल्याच्या कारणावरुन ही मारहाण (the beating) झाल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) भातकुली तहसीलमध्ये घडली आहे. (Deputy Tehsildar allegedly beaten up by lady after fight over Ration Card)

    नेमकं काय घडलं (What exactly happened)
    विजय मांजरे असे मारहाण झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. ते भातकुली तहसीलमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या महिलेचे रेशन कार्ड संदर्भात काम होते. याच कामातून हा वाद समोर आला आहे.

    रेशन कार्डवरुन वाद
    संबंधित महिला ही भातकुलीच्या तहसील कार्यालयात गेली होती. यावेळी मांजरेंनी तिच्याकडे रेशन कार्ड संदर्भात विचारणा केली. त्यातूनच या महिलेने थेट नायब तहसीलदारांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

    नायब तहसीलदारांची पोलिसात धाव (Deputy tehsildar runs to police)
    दरम्यान या प्रकरणी भातकुलीचे नायब तहसीलदार विजय मांजरे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.