बेवारस कुत्र्याच्या अंगावर ओतले गरम डांबर; प्राणिप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण

अमरावतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी (disgrace to humanity) एक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी शहरातील दिल्ली पब्लिक स्कुल परिसराजवळ एक डांबराने माखलेले बेवारस श्वान प्राणीप्रेमी बाळासाहेब विघे यांच्या नजरेस पडले.

    अमरावती (Amaravati).  अमरावतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी (disgrace to humanity) एक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी शहरातील दिल्ली पब्लिक स्कुल परिसराजवळ एक डांबराने माखलेले बेवारस श्वान प्राणीप्रेमी बाळासाहेब विघे यांच्या नजरेस पडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरता खळबळ उडाली असून प्राणी प्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.

    अंगावर गरम डांबर ओतल्यामुळे (hot tar being poured) श्वानाला खूप त्रास होत होता. इतकंच नाहीतर श्वान पानटपरी मागे ठेवलेल्या कडप्याला पूर्ण चिकटली होती. स्थानीक नागरिकांनी तिला ओढून बाहेर काढलं अशीही माहिती देण्यात आली आहे. या क्रुरतेच्या घटनेमुळे खरंच माणसात माणुसपण आणि वेदना शिल्लक राहिल्या का? असा प्रश्न समोर येतो.

    मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी शहरातील जखमी-बेवारस प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर याबाबत बाळासाहेब विघे यांनी माहिती दिली. तात्काळ वसा रेस्क्यू टीमचे सहाय्यक पशु चिकित्सक शुभम सायंके, गणेश अकर्ते अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके, अंकुश लोणारे आणि प्रसन्ना यांनी येऊन त्या बेवारस मादी श्वानाचा रेस्क्यू केला.

    तिच्या अंगावर डांबर टाकल्याचे लक्ष्यात आल्यानंतर उपचाराला तिथेच सुरुवात करण्यात आली. डांबर गरम असल्याने तिची त्वचा भाजली आहे आणि तिला विशेष काळजीची गरज आहे. त्यामुळे ती बरी होई स्तोवर तिची काळजी आम्ही वसामध्ये घेत आहोत अशी माहिती वसाचे भूषण सायंके यांनी दिली.