पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक थांबविली; १२ रेल्वे गाड्या रद्द

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 02279  पुणे-हावडा विशेष, 02280 हावडा-पुणे विशेष, 25 व 29 मे रोजी सुटणारी 02833 अहमदाबाद-हावडा विशेष...

    अमरावती. बंगालच्या उपसागरावर घोंगावत असलेले ‘यास’ चक्रीवादळ येत्या दोन दिवसात पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने 24 ते 30 मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये बडनेरा येथून जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या व दोन पार्सल गाड्यांचा समावेश आहे.

    रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 02279  पुणे-हावडा विशेष, 02280 हावडा-पुणे विशेष, 25 व 29 मे रोजी सुटणारी 02833 अहमदाबाद-हावडा विशेष, 25 व 26 मे रोजी सुटणारी 02824 हावडा-अहमदाबाद विशेष, 02810 हावडा-मुंबई विशेष, 02259 मुंबई-हावडा विशेष, 02260 हावडा-मुंबई विशेष, 02905 ओखा-हावडा विशेष, 02906 हावडा- ओखा विशेष, 02255 लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या विशेष या गाड्यांचा समावेश आहे.

    पार्सल गाड्या

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-शालिमार व शालिमार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, सांगोला-शालिमार व शालिमार-सांगोला पीसीईटी या पार्सल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.