nagpur amravati highway bus fire

तिवसाजवळ अचानकपणे या बसचा टायर फुटला. त्यानंतर अचानक या बसला आग लागली.

  • सुदैवाने जीवितहानी टळली

तिवसा. रविवार-सोमवारच्या रात्री १.४५ वाजताच्या दरम्यान अमरावती ते नागपूर महामार्ग क्र.६ वर धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला( Travels on the Nagpur-Amravati highway caught fire). यावेळी ट्रॅव्हल्समध्ये ५२ प्रवासी होते. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली.
महेंद्र ट्रॅव्हल्स नामक स्लीपर कोच खासगी बस रायपूर ते सुरत ५२ प्रवाशांना घेऊन जात होती. तिवसाजवळ अचानकपणे या बसचा टायर फुटला. त्यानंतर अचानक या बसला आग लागली. गस्तीवर असलेले पोलिस निलेश खंडारे यांनी समयसुचकता राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

त्यानंतर लगेच नगर पंचायतचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. नगराध्यक्ष वैभव वानखडे व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी मदतकार्य सुरु केले. १ तासाहून अधिक वेळ आग विझवायला लागला. या घटनेमुळे महामार्गावर काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.