१ मे ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला ‘काळा दिवस’; वेगळा विदर्भ राज्याची केली मागणी

वेगळा विदर्भाच्या मागणीकडे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळा दिवस पाळून पुन्हा एकदा वेगळा विदर्भ देण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसूनच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काळा दिवस पाळला.

    अमरावती (Amravati).  वेगळा विदर्भाच्या मागणीकडे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळा दिवस पाळून पुन्हा एकदा वेगळा विदर्भ देण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसूनच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काळा दिवस पाळला.

    स्वतंत्र महाराष्ट्रात विदर्भावर नेहमीच अन्यायच झाल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे म्हणने आहे. एकेकाळी संप्पन असलेला विदर्भ हा राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणामुळे दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त, कुपोषणग्रस्त विदर्भ झाल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे म्हणने आहे. कोरोनाच्या महामारीतही विदर्भाशी पक्षपात करण्यात आला असून पुरेषे हॉस्पिटल नाही, बेड नाही, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नाही, रुग्णांचे अतोनात हाल होत आहे तर दुसऱ्याबाजूने प्रामुख्याने वीज निर्माण करणाऱ्या, राज्याच्या तुलनेत वापर कमी असूनसुद्धा विदर्भातील सर्वासामान्य जनतेचे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला.

    त्यामुळे 1 मेला महाराष्ट्र दिनालाकाळ्या फिती बांधून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काळा दिवस पाळला. यामध्ये रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, सतीश प्रेमलवार, माधवराव गावंडे, डॉ विजय कुबडे, रियाजखान, अशोक हांडे, बाबाराव जाधव, दिपक कथे, सुनील साबळे, दिगंबर चुनडे, प्रकाश लद्धा, नंदकुमार देशमुख, दिनेश ढवस, डॉ. सुरेंद्र खेरडे, डॉ. नीलकंठ यावलकर, रमेश जीवनकर, पांडुरंग बिजवे, सुभाष धोटे, सचिन राऊत, अतुल काळे यांचा सहभाग होता.