नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याचा आनंद गगणात मावेना! जल्लोषात पडला देहभानाचा विसर; १०० जणांवर गुन्हा दाखल

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या (Amravati Lok Sabha constituency) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केले. (caste certificate was canceled by the court) याच पार्श्वभूमीवर माजी खासदार आनंदराव अडसुळ (former MP Anandrao Adsul) शहरात दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात (Rajkamal Chowk) जल्लोष केला.

    अमरावती (Amravati). अमरावती लोकसभा मतदार संघाच्या (Amravati Lok Sabha constituency) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केले. (caste certificate was canceled by the court) याच पार्श्वभूमीवर माजी खासदार आनंदराव अडसुळ (former MP Anandrao Adsul) शहरात दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात (Rajkamal Chowk) जल्लोष केला. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन करणे शिवसैनिकांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

    नवनीत राणा यांचे मुंबई उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अमरावती लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या याचिकेवर हा निर्णय न्यायालयाने दिला. याच पार्श्वभुमीवर आनंदराव अडसुळ यांच्या स्वागताचा राजकमल चौकात कार्यक्रम घेतल्याल प्रकरणात अडसूळ यांच्यासह १०० पेक्षा अधिक शिवसैनिकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी ११ जूनला गुन्हे दाखल केले.

    संचारबंदी उल्लंघनासह १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे यांच्या नेत्तृत्वात राजकमल चौकातील सीताराम बाबा मार्केटसमोरील ओट्यावर शिवसैनिकांकडून या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोना काळात ही बाब संचारबंदी उल्लंघनाची ठरली आहे. त्यामुळे पोलिसांनी अडसूळ यांच्यासह सुनिल खराटे, शाम देशमुख, प्रविण हरमकर यांच्यासह १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.