विदर्भातील दिंड्यांना आषाढी वारीला जाण्याची परवानगी मिळणार का?

अमरावती जिल्ह्यातील (In Amravati district) कौंडण्यपूर (Kondanyapur) विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) विश्वस्त मंडळी, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना (the Warkari organizations) विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये.....

    अमरावती (Amravati).  अमरावती जिल्ह्यातील (In Amravati district) कौंडण्यपूर (Kondanyapur) विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) विश्वस्त मंडळी, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना (the Warkari organizations) विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये आई रुक्मिणी मातेने सर्व संतांना पदरात घेऊन आपल्या सोबत आषाढी वारीला पंढरपूरला नेऊ. सर्व संतांची वारी घडवून आणल्यामुळे हा एक ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो, असं मत विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केलं आहे.

    आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत आणि त्यामध्ये विदर्भातील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. पण विदर्भामधून इतरही काही गेल्या शेकडो वर्षाची पायी जाण्याची परंपरा जोपासत आहेत. म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने का होईना, पण आषाढी वारीमध्ये सहभागी होता यावे याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करून प्रशासकीय मीटिंग लावण्यात आली होती.

    त्या मीटिंगमध्ये आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर संस्थान यांच्या पालखी सोहळ्यासोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी विणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा ही विनंती करण्यात आली होती. आणि वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून विदर्भातील इतरही दिंड्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते.