तर विदर्भातील ‘या’ पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या! पक्षांचा विहंगम नजारा पाहण्याची संधी

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मेळघाटात (Melghat) शाळा बंद असल्याने शाळांमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. यामुळे विद्यार्थी घरातच बंदिस्त झाला. मात्र, या शांततेचा फायदा पक्षी व प्राणी (the birds and animals) खऱ्या अर्थाने उचलत असून ते निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत (Birds and animals are enjoying nature) आहेत.

    अचलपूर (Achalpur) : कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मेळघाटात (Melghat) शाळा बंद असल्याने शाळांमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. यामुळे विद्यार्थी घरातच बंदिस्त झाला. मात्र, या शांततेचा फायदा पक्षी व प्राणी (the birds and animals) खऱ्या अर्थाने उचलत असून ते निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत (Birds and animals are enjoying nature) आहेत.

    निसर्गाने प्रदान केलेल्या नीरव शांततेत सध्या मेळघाटातील कुलंगणा ते वस्तापूर या मार्गावर भल्या पहाटे जमणारे पक्ष्यांचे थवे व परिसरात भरणारी बगळ्यांची शाळा बघून येथे येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. (Thousands-of-birds-flock-to-Melghat-in-morning-time)

    चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर ते कुलंगणा या मार्गालगत दररोज सकाळच्या सुमारास जवळपास एक हजारावर बगळ्यांचा जमावडा असतो. या परिसरात सकाळी सुमारे दोन तास पक्षांचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. अनेक पक्षिमित्र पक्षिनिरीक्षणासाठी दूरवरून येथे येतात. मेळघाटातील नागरिकांना घरबसल्या हे पक्षी पाहायला मिळत आहेत.

    एक महिन्यापासून अगदी भल्यापहाटे दररोज न चुकता हे बगळे याठिकाणी येतात. उन्ह कोवळे असेपर्यंत तेथेच थांबतात व नंतर अचानक दिसेनासे होतात. अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह मेळघाटातील शाळा बंद असल्या तरी बगळ्यांच्या भरत असलेल्या शाळेमुळे स्थानिक पालकांसह विद्यार्थीही आनंदित झाले आहे.