मिल सुरू करण्याच्या मागणीसाठी कामगार ३०० फूट टॉवरवर चढला

मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ९० टक्के कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे. सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे.

    अमरावती (Amravati) : अमरावती जिल्ह्यातील (Amaravati District) अचलपुरात (Achalpur) असणारे एनटीसी भारत सरकारमार्फत (The NTC Government) चालवण्यात येणारी फिनले मिल (Finlay Mill) सध्या अठरा महिन्यांपासून बंद असल्यामुळे कामगारांची दयनीय अवस्था झालेली आहे. यासाठी बरेचदा शासनाला निवेदनसुद्धा देण्यात आली. तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनसुद्धा करण्यात आलीत. तरीसुद्धा मिल सुरू झाला नाही व आता येथील कामगारांना रुजूसुद्धा करून घेतल्या गेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

    मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ९० टक्के कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे. सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. तर असेच सुरू असल्यास भविष्यात अनेक कामगार आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर गिरणी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी निवेदने दिली आहे. परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

    मिल सुरू झालेला नसल्याने आम्ही आता जीवघेणे आंदोलन करत आहोत कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ याची सर्वस्वी जबाबदारी एनटीसी प्रशासनाची राहील. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या टॉवरवरच बसू. इथेच उपोषण करू असा इशारा टॉवरवर चढलेल्या आंदोलनकारीने दिला आहे. अभय माथने, धर्मा राऊत व आणखी एक अशी टॉवरवर चढलेल्या तीघांची यांची नावे आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसवू अशी भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे.