नाना पटोले(प्रदेशाध्यक्ष, काॅंग्रेस पक्ष) आणि यशोमती ठाकुर (आमदार)
नाना पटोले(प्रदेशाध्यक्ष, काॅंग्रेस पक्ष) आणि यशोमती ठाकुर (आमदार)

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक (meeting of Congress party) पार पडली. या बैठकीत नाना पटोले यांनी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना रणरागिणी संबोधत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

    अमरावती (Amravati).  काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक (meeting of Congress party) पार पडली. या बैठकीत नाना पटोले यांनी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना रणरागिणी संबोधत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. यशोमती ठाकूर आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी कशा प्रकारे लढत असतात याचं उदाहरणही नाना पटोले यांनी दिलं आहे.

    नाना पटोले यांनी म्हटलं, “तुम्हीच यशोमतीताईंला वाघीण, रणरागिणी म्हटलं आहे. मी गेली अनेक वर्षे विधानसभेत यशोमती ताईंना पाहत आलो आहे. मतदारसंघतील लोकांच्या, तुमच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी या रणरागिणी भांडत असतात. वेळ आली तर तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला ही त्या मागेपुढे पाहत नाही.”

    नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्याचा काल समारोप झाला तेव्हा ते अमरावतीच्या मोझरी येथे बोलत होते. 2024 ला काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर सरकार चालवू असे देखील नाना पटोले यांनी सांगितले.