प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एक मुलगी मुंबईतच राहत असल्याने शेवटी त्या मुलीनेच आईला अग्नी दिला एवढे मोठे कुटुंब असतानासुद्धा एकमेकांच्या अंत्यविधीला कोणीच जाउ शकत नव्हते यासारखी दुसरी दुर्देवी गोष्ट नव्हतीकोरोनाच्या या महामारीत कित्येक लोक अन्न पाण्यावाचुन मेली तर कितीतरी लोक अपघातात गेलीदेवा आमच सर्वांच एकच सांगन आहे की आम्ही चटणी भाकरी खाउन जगु उपाशीपोटी राहु पण ही वेळ कोणावरही आणु नकोस एक वर्ष झाले तरीही आम्ही भयभीतच आहोत.

    माळशिरस: गेल्या १ वर्षापासून कोरोना नावाच्या महाभयंकर आजाराने पूर्ण जगात थामान घातले आहे. अनेकांचे निष्पाप बळी गेले त्या निष्पाप जीवांचा काही दोष होता का? या एका वर्षात लॉकडाउन नावाचा एक शब्द आला आणि होत्याच नव्हतं करुन गेला.

    ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊन झाले त्यावेळी सर्वात जास्त त्रास हा सामान्य माणसाला झाला त्यावेळी पैसे असुनदेखील सामान्य मानसाला साधा भाजीपाला मिळत नव्हता किंवा दवाखान्यात जायचे जरी असले किंवा महत्वाच्या कामासाठी जायचे असले तरी जाता येत नव्हते.पण तरीही सामान्य माणसाने ते लॉकडाउन पत्कारले व जगण्याची ईच्छा ठेउन जगत राहिला. परंतु पेपरात किंवा टीव्हीवरील बातम्या पाहुन काळजाचा ठोका चुकत होता कारण आपल्या घरातील कोणी व्यक्ती महत्वाच्या कामासाठी घराबाहेरगेला तरी तो घरी येईपर्यंत भीती वाटायची.

    याच काळात ज़र कोणाच्याआईचा साध्या आजाराने मृत्यु झाला तर मुलाला किंवा मुलीला त्याच्या अंत्यविधीला जाता येत नव्हते. या काळात हाच अनुभव आला की जुनी माणसं सांगायची की मला चार पाच मुले आहेत परंतु त्याच मुलांना हेच कोरोनाच लॉकडाउन आड यायच.

    त्याच कालावधी मध्ये एक कुटुंब मुंबई या ठिकाणी वास्तव्यास होत त्यांच मुळ गाव हे नंदुरबार होत त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणजेच त्या कुटुबातील मुलगा आपल्या गावी काही कामानिमित्त गेला होता आणि लॉकडाउन झाल ईकडचे ईकडे आणि तिकडचे तिकडे अशी परिस्थीती त्या कुटुंबाची झाली.त्या काळात मुलगा हा त्याच्या गावीच अडकुन पडला आपल्या कुटुंबाची काळजी करता करता एक दिवस त्या मुलाला हृदयविकीराचा तिव्र धक्का आला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला ही गोष्ट त्याच्या कुटुबालासुद्धा माहिती पडली नाही त्याचे पुर्ण कुटुंब हे मुंबईत होते परंतु त्या कुटुंबाला लॉकडाउनच्या कहराने अंत्यविधीला देखील जाता आले नाही. त्या मुलाच्या आईला ही बातमी त्याच्या बायकोने व मुलांनीदेखील सांगीतली नाही ती आई आपल्या एकुलत्या एक मुलाची रोज वाट पहायची माझ बाळ आज येईल उद्या येईल ह्यातच बरेच दिवस गेले परंतु ज्यावेळी त्या आईला कळले की आपला मुलगा या जगात नाही त्यावेळी ती आई खुपच आजारी पडली परंतु ती म्हातारी आजारी पडल्यानंतर तीची सुन व नातवंडे सर्वांना सांगायचे की म्हातारीला दवाखान्यात न्यायचे परंतु शेजारी पाजारचे लोक कोणीच मदतीला येत नव्हते कारण शेजारचे लोक कोरोणाला घाबरत होते

    कसेबसे त्या सुनेनी आणि नातवंडांनी त्या म्हातारीला दवाखान्यात नेण्यासाठी घरातुन बाहेर काढले तर बाहेर पोलिसांचा खडा पहारा चालु होता परंतु त्या म्हातारीची परिस्थीती पाहता त्या पोलीसाच्या वर्दीतील देवमाणुस जागा झाला व त्या म्हातारीला दवाखान्यात नेण्यासाठी सहकार्य करुन स्वत: पैसे दिले व गाडी करुन दवाखान्यात नेले परंतु दवाखानात जात असतानाच त्या म्हातारीची प्राणज्योत मालवली त्या म्हातारीला परत घरी आणले परंतु त्या म्हातारीला आणखी चार मुले होती पण त्या चारही मुलांना तीच्या अंत्यविधीला येता आले नाही कारण लॉकडाउन!

    एक मुलगी मुंबईतच राहत असल्याने शेवटी त्या मुलीनेच आईला अग्नी दिला एवढे मोठे कुटुंब असतानासुद्धा एकमेकांच्या अंत्यविधीला कोणीच जाउ शकत नव्हते यासारखी दुसरी दुर्देवी गोष्ट नव्हतीकोरोनाच्या या महामारीत कित्येक लोक अन्न पाण्यावाचुन मेली तर कितीतरी लोक अपघातात गेलीदेवा आमच सर्वांच एकच सांगन आहे की आम्ही चटणी भाकरी खाउन जगु उपाशीपोटी राहु पण ही वेळ कोणावरही आणु नकोस एक वर्ष झाले तरीही आम्ही भयभीतच आहोत.