“तुझसे नाराज नहीं जिंदगी..हैराण हू मै….”… भिंवडीपासून चिमुकल्यांसह पित्याचा सुरू झालेला प्रवास

आशा स्वयंसेविका व ग्रामस्थांनी चिमुकल्यांना खाऊ दिला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील एका वाहनात बसवून त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था केली. येताना त्रासलेले चेहरे जाताना मात्र निःशब्दपणे आभार मानून गेले. आतार्यंतच्या प्रवासात आम्हाला कोणीच मदत केली नाही, जवळही केले नाही, मात्र माणूसकी जिवंतच आहे यावर माझा विश्वास होता अशी भावना गाडे याने जाताना व्यक्त केली.पोहचल्यावर फोनवरून आभार मानायला मात्र तो विसरला नाही.

  राजेंद्र झेंडे , पाटस : जगभर हाहाकार उडवलेल्या कोरोनाच्या भीतीने देशभऱातील श्रमिकांनी जीव तळहातावर घेऊन जो प्रवास सुरू केला. मागील वर्षी देशात कोरोना या महाभंयकर विषाणुने केलेल्या एन्ट्रीने आजही देश हळहळतोय मात्र मगाली वर्षीचा कोरोनाचा भयानक काळ आठवला की आज ही अंगावर काटे येतात. याच कोरोनाने माणुसकी हिरावून घेतली होती. आपलीच जीवाभावाची माणसे, आपलीच नातेगोते अक्षराक्षा हिरावून घेतली होती. आपल्याच माणुस आपल्याच माणसाला जवळ करत नव्हाता. मग परका माणुस जवळ तरी कोणं करणार आणि त्याला आपलं कोण म्हणारं. त्याची झळ यावर्षी प्रखरतने जाणवत आहे, मात्र मागील वर्षाच्या कोरोना काळातील आठवणी यंदा ही विसरल्या गेल्या नाहीत. मागील वर्षी सुनिल मारूती गाडे हा बाप आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना घेऊन आपल्या गावच्या दिशेने निघला त्याच्या या आठवणी आजही मनाला हुरहुर केल्या शिवाय राहत नाही.

  -कोरोना गरीबांच्या जीवावर उठला
  कोरोनाच्या भीतीने आसाच एक बाप दोन चिमुकल्यांना घेऊन चाळीशीच्या पाऱ्यातही भिवंडी ते यवतमाळ हे अंतर कापण्याच्या उद्देशाने दररोज चालतोय..पायाच्या वेदना आणि डोक्यावरच्या उष्ण उन्हाची तमा न करता त्याचा चाललेला प्रवास पाटसपर्यंत पोचला, रस्ते माहिती नाहीत अन रस्त्याने पोलिस पकडतील म्हणून रेल्वेच्या रुळाकडेने त्याचा प्रवास सुरूय, पण हे चित्र पाहून माणूसकीच काय, जीवघेणा कोरोना देखील शरमेल..!

  कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने श्रीमंत हतबल झालेत. मात्र श्रीमंतांनीच देशात आणलेला कोरोना गरीबांच्या जीवावर उठला आहे. रोजगार हिरावल्याने खायची भ्रांत आणि शहरातली वाढती महामारी पाहून आपले गाव गाठण्याच्या इच्छेने श्रमिकांचे लोंढेच्या लोंढे सध्या विविध रस्त्याने दिसत आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश ते अगदी बंगालपर्यंतच्या श्रमिकांचे हे जथ्थे कोणालाही काहीही न मागता, कशाचीही अपेक्षा न ठेवता मन थकले, तरी शरीर थकेपर्यंत प्रवास थांबवत नाहीत काहींनी तर अगदी गाव जवळ येईपर्यंत ठेवलेले अवसान गळून पडल्याच्या घटना ताज्या आहेत.

  -प्रवास अत्यंत वेदनादायी व जीवघेणा ठरला
  यवतमाळ येथील तिशीतला सुनिल मारूती गाडे युवक पत्नीसह भिवंडीत पोटाची खळगी भरायला आला. भिवंडीतील एका खासगी वाहनावर वाहनचालक म्हणून काम करीत असतानाच त्याच्या पत्नीचे चार वर्षापूर्वी आजारपणात निधन झाले. पत्नीच्या पश्चात पाच वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी या दोघांचा सांभाळ त्यालाच करावा लागला. तशाही स्थितीत सारे सांभाळत असतानाच कोरोना आला आणि सारीच कामे बिघडवली. नोकरी गेली. सारेच ठप्प झाले. मग कोरोना जिवघेणा आहे, बायकोला आधीच आपल्यापासून नियतीने दूर नेले, आता कोणीही दूर जाण्याची घटना सहन होणार नाही, या भीतीने त्याने यवतमाळ जवळ करण्याचे ठरवले.

  पोलिस जाऊ देत नाहीत, म्हणून आडमार्गाचे रस्ते निवडून दोन्ही चिमुकल्यांना घेवून तो निघाला. वाहनचालक असूनही तो आपल्या मुलांना वाहनांमध्ये प्रवास घडवू शकला नाही. रेल्वेच्या रूळाकडेने प्रवास करीत त्याने पुणे गाठले. पुण्यावरून पुणे ते सोलापुर महामार्गाच्या कडेने तेराव्या दिवशी तो पाटसला पोहचला. मात्र पाटस पर्यंतचा त्याचा हा प्रवास अत्यंत वेदनादायी व जीवघेणा ठरला. या लहान मुलांना उपाशी पोटी, पायी चालत तर कधी खांद्यावर घेवून तो चालत होता. वाहनांना हात केला तर कोणते वाहन थांबत नव्हते. लहान लेकरांची अवस्था त्याला पहावत नाही, पण नियतीच्या फेऱ्यापुढे काही उपाय चालत नाही, म्हणून तो चालतोय. दरमजल एक नवे गाव जवळ करतोय थेट यवतमाळचा रस्ता जवळ नाही, मात्र कायद्याच्या दंडुक्यांपासून हाच रस्ता आपल्याला गावापर्यंत नेऊ शकेल असा त्याला विश्वास होता.

  सुनिल गाडे आपल्या चिमुकल्यांना घेवून पाटसमध्ये टोल नाका ओलांडून जात असताना पाटस आपती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच संभाजी खडके, आरोग्य सेवक भीमराव बडे, तलाठी शंकर दिवेकर, पत्रकार राजेंद्र झेंडे, ग्रामस्थ सुधीर पानसरे, पप्पु पोळेकर आदींनी त्या चिमुकल्यांना पाहिले. त्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि सर्वांनी आधार देत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. डॉ. बडे यांनी आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे दिली. आशा स्वयंसेविका व ग्रामस्थांनी चिमुकल्यांना खाऊ दिला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील एका वाहनात बसवून त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था केली. येताना त्रासलेले चेहरे जाताना मात्र निःशब्दपणे आभार मानून गेले. आतार्यंतच्या प्रवासात आम्हाला कोणीच मदत केली नाही, जवळही केले नाही, मात्र माणूसकी जिवंतच आहे यावर माझा विश्वास होता अशी भावना गाडे याने जाताना व्यक्त केली.पोहचल्यावर फोनवरून आभार मानायला मात्र तो विसरला नाही.