देशात गेल्या 24 तासात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद, 36 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांचीं नोंद झाली आहे.

    देशात कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांचीं नोंद झाली आहे.
    काही दिवसापासून देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत काल रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

    देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी ही नोंद 13 हजार 272 इतकी होती. म्हणजे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 2,482 रुग्ण घटले. तसेच यामागील एक सकारात्मक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजारांहून अधिक आहे.

    देशात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्या आतापर्यंत भारतात 4 कोटी 36 लाख 99 हजार 435 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 13 लाख 15 हजार 536 डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेत 19 ऑगस्ट 2022 पर्यंत 209 कोटींकडून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.